T 20 वर्ल्ड कप चे नवीन वेळापत्रक जाहीर

 t20 world cup match

टी 20 वर्ल्ड कप चे नवीन वेळापत्रक जाहीर

t20 world cup match : यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या ICC T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसए मधील एकूण 9 मैदानांवर 2024 च्या T20 विश्वचषकात एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. T20 विश्वचषक 2024 चा सलामीचा सामना 1 जून रोजी यजमान यूएसए आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे.

 

 

या दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार.

भारतीय संघाला अ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासोबत ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. तर भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध तिसरा गट सामना खेळणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे.

 

 

वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत कर्ज 4कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत न जाता 50000 ते 1000000 पर्यंतन जाता 50000 ते 1000000 पर्यंत

16 जानेवारी 2024 current affairs चालु घडामोडी

केंद्र सरकार देणारं 6 हजार रुपये