सरसकट कर्जमाफी होणार

 Agriculture News

कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्याकडे, सरसकट कर्जमाफी होणार ?

Agriculture News | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाखांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तपशील महायुतीला खटपट करून मिळत नाही. त्यामुळे आता सभागृहात घोषणा केल्यामुळे त्यातून तुम्ही मार्ग काढावा अशी विनंती करत सहकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात फाईल दिलेली आहे.

बऱ्याच दिवसापासून प्रसार माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती समोर येत होती. याचं बाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महाऑनलाईन कंपनी बंद होऊन आता माहिती सुरू झाले आहे. त्यामुळे तपशील मिळत नसल्याचे कारण देत सहकारी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळामध्ये राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आलेली होती. ही योजना त्यावेळी महाऑनलाईन तयार केलेल्या पोर्टल द्वारे राबविण्यात येत होती.

परंतु आता सुद्धा उर्वरित शेतकऱ्यांसाठी ही योजना त्या पोर्टल द्वारे राबवणे अपेक्षित आहे. किंबहुना त्या पोर्टलवर शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा आहे. मात्र ऑनलाईन बंद होऊन महाआयटी सुरू करण्यात आलेली आहे.

त्यामुळे महाऑनलाईन चा डाटा आपण पुन्हा स्थापित करू शकत नाही. असे पत्र आयटी विभागाच्या प्रधान सचिवांनी सहकार विभागाला दिलेले आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा काळात एका व्यवस्थेवरील माहिती दुसरी व्यवस्थेवर घेणे शक्य आहे. त्यामुळे महाआयटीचे कारण तकलादू असल्याचा दावा सहकार विभागाने दावा केला आहे.

परंतु या अडथळ्यामुळे सहकारी विभाग कर्ज माफी साठी प्रयत्न करत असताना महायुतीने दिलेल्या पत्रामुळे पुढील प्रक्रिया बंद पडली आहे. त्यामुळे यातून मुख्यमंत्री कार्यालयाने मार्ग काढावा अशी विनंती सहकार विभागाने केली आहे. अशी फाईल त्यांनी मुख्यमंत्र्याकडे पाठवली आहे. या अधिवेशनापूर्वी यावर मार्ग निघावा अपेक्षा सहकार विभागांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्त योजना

  • 30 जून 2016 पर्यंत थकित असलेले सर्व कर्ज आणि मुद्दल व्याजासह दीड लाखापर्यंत कर्ज माफ
  • दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता म्हणून दीड लाख रुपये पर्यंत कर्ज माफ .
  • 2015-16 मधील कर्जत पर पिढीच्या 24% किंवा 25000 रुपयांपैकी कमी असलेले रक्कम प्रोत्साहन पर अनुदान
  • प्रोत्साहन रकमेसाठी 89 लाख शेतकरी पात्र
  • प्रोत्सन योजनेसाठी 34.022 कोटी रुपयांची तरतूद
  • 1.29 लाख कर्ज खात्यांची 1644 कोटी रुपयांची तरतूद
  • परतफेड आणि दोन लाख 94 हजार कर्ज खात्यांची 3985 कोटी रुपयांची कर्जमाफी शिल्लक.
  • प्रोत्साहन योजनेतील 2.33 लाख कर्ज खात्यांचे 346 कोटी शिल्लक
  • सहा लाख 55 हजार कर्ज खाली कर्ज माफी पासून वंचित.
  • 5975 कोटींची कर्जमाफी प्रतीक्षेत

1 thought on “कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्याकडे, सरसकट कर्जमाफी होणार ?”

Leave a Comment


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत कर्ज 4कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत न जाता 50000 ते 1000000 पर्यंतन जाता 50000 ते 1000000 पर्यंत

16 जानेवारी 2024 current affairs चालु घडामोडी

केंद्र सरकार देणारं 6 हजार रुपये