24 जानेवारी दिनविशेष

24 जानेवारी – घटना

1848: कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले.

1857: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.

1862: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.

1901: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

1916: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.

1942: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.

1943: पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार.

1966: भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.

1966: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.

1972: गुआममध्ये इ. स. 1944 पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.

1976: बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे 1 ऑगस्ट 1977 रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL) असे करण्यात आले.

1984: अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत कर्ज 4कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत न जाता 50000 ते 1000000 पर्यंतन जाता 50000 ते 1000000 पर्यंत

16 जानेवारी 2024 current affairs चालु घडामोडी

केंद्र सरकार देणारं 6 हजार रुपये