20 जानेवारी current affairs चालु घडामोडी

 

  • असलेल्या रामाचं लोभस रूप या मूर्तीत पाहायला मिळालं आहे. मूर्तीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेल्या सर्व कामगारांनी गाभाऱ्यात मूर्ती ठेवल्यानंतर हात जोडून प्रार्थनादेखील केली. तसेच रामनामाचा जप केला.

अरूण योगीराज यांनी साकारली श्रीरामाची मूर्ती

  • कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. मैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण योगीराज यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्पं साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. अरुण यांचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार. तर, त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना मैसूरच्या राजानं संरक्षण दिलं होतं.
देशभरातील पन्नास टक्क्यांहून अधिक प्राथमिक शिक्षकांकडे किमान पात्रतेचा अभाव
  • देशभरातील प्राथमिक शिक्षकांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक शिक्षक हे शिक्षणशास्त्र पदविका, पदवी असे किमान पात्रता निकष पूर्ण करणारे नाहीत, तर बहुसंख्य शाळांमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी अध्यापनासाठी त्या विषयांतील पदवीधर शिक्षक नसल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने केलेल्या अभ्यासातून उघड झाले आहे.
  • असरच्या अहवालातून नुकतेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अधोगतीचे दाखले मिळाल्यानंतर आता देशभरातील शाळांमधील शिक्षकांची स्थितीही फारशी बरी नसल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन टीचर्स एज्युकेशनने केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांतून दिसते आहे. देशभरातील प्राथमिक शिक्षकांपैकी अवघे ४६ टक्के शिक्षक हे शिक्षणशास्त्रातील पदविकाधारक (डीएड), किंवा पदवीधारक (बीएड) आहेत. खासगी शाळांमध्ये अपात्र शिक्षकांची संख्या तुलनेने अधिक आहे. पदवीचे शिक्षण ज्या विषयात घेतले आहे त्याच विषयाचे अध्यापन करण्याची संधी ६८ ते ७० टक्के शिक्षकांना मिळाली असली तरी गणित, विज्ञान, इंग्रजी विषय शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे शिक्षण गणित विज्ञान किंवा इंग्रजी विषय शिकवण्यासाठी पदवीचे शिक्षण या विषयांतील नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे विषय शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी ३५ ते ४० टक्के शिक्षकांची पदवी गणित, विज्ञान किंवा इंग्रजी विषयांतील नाही.
  • या अहवालाचे प्रकाशन गुरूवारी केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजय कुमार यांच्या हस्ते, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, सेंटर फॉर एक्सलन्स इन टीचर्स एज्युकेशनच्या अध्यक्ष पद्मा शारंगपाणी यांच्या उपस्थितीत करण्यात आहे.

खासगी शाळांचा वरचष्मा, तरी शिक्षकांची पळवणूक

  • एकूण शिक्षकांपैकी खासगी शिक्षणसंस्थांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक शिक्षक हे खासगी शिक्षणसंस्थांमध्ये कार्यरत आहेत. तेथे त्यांना पायाभूत सुविधा अधिक चांगल्या मिळतात. मात्र, खासगी संस्थांतील शिक्षकांना अल्प वेतनावर काम करावे लागत असल्याचे दिसते आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक शिक्षकांना कोणतीही हमी, कायदेशीर कंत्राट याशिवायच काम करा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stephen curry Golden State Warriors | #30 | Guard

16 जानेवारी 2024 current affairs चालु घडामोडी